DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आर्यन खानला मोठा दिलासा; अखेर उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

मुंबई । वृत्तसंस्था 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद आरोपींचे वकील करत आहेत. पण, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचे आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडली आहे. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो, असे अनिल सिंग म्हणाले.

व्हॉट्सअॅपच्या चॅटवर आक्षेप घेता येणार नाही, कारण आमच्याकडे आरोपींचे ६५ ब प्रमाणे घेतलेले जबाब आहेत. त्या क्रुझवर पार्टीचे आयोजन केले होते आणि माझे अशील आरोपींना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अटक केल्याचे सांगत आहेत. तो कोरडा दिवस होता म्हणून आम्ही त्यांना जाऊ द्यावे लागत होते, असे म्हणत अनिल सिंग यांनी आरोपींच्या वकिलांना टोला लगावला.

सिंग म्हणाले, आमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही, असा युक्तिवाद आरोपी करत आहे. पण, पंचनामा पाहिला तर अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहेत. अरबाजने स्वतः आपल्या बुटातून ड्रग्ज काढून एनसीबीच्या स्वाधीन केले होते. आरोपी क्रुझवर ‘ब्लास्ट’ करण्यासाठी जात होते, असे चॅटमध्ये म्हटले आहे. क्रुझवर २ दिवसांसाठी सेवन करण्यासाठीच त्यांनी सोबत चरस बाळगले. ते अरबाजकडे सापडले.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.