DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, जाणून घ्या कसं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत  खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा. जन धन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवर खाते सुरू केले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेला ७ वर्षे पूर्ण झाली आहे आणि याद्वारे आतापर्यत ४१ कोटीपेक्षा जास्त खाते सुरू करण्यात आली आहेत. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यामधीलच एक सुविधा ओव्हरड्राफ्टची आहे. ही सुविधा काय आहे ते पाहूया.

 

असे मिळतील १०,००० रुपये

जन धन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात बॅलन्स नसल्यावरदेखील तुम्हाला १०,००० रुपयांपर्यतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्पकालावधीच्या कर्जाप्रमाणेच आहे. आधी ही रक्कम ५,००० रुपये होती. सरकारने आता यात वाढ करून ती १०,००० रुपये केली आहे. या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वय ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असले पाहिजे. असे नसल्यास फक्त २,००० रुपयांपर्यतचा ओव्हरड्राफ्ट मिळतो.

२०१४ मध्ये सुरू झाली होती योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्यदिनाला भाषण करताना जनधन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याचवर्षी २८ ऑगस्टला या योजनेची सुरूवातदेखील झाली होती. या योजनेअंतर्गत ६ जानेवारी २०२१ पर्यत जनधन खात्यांची एकूण संख्या ४१.६ कोटी झाली आहे. सरकारने २०१८ मध्ये आणखी सुविधा आणि लाभांसह याची दुसरी आवृत्ती सुरू केली होती.

जन धन योजनेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत

  •  जन धन योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलाचे खातेही उघडता येते.
  •  या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.
  •  यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते.
  • हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.
  •  यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.