जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण १२४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून प्राथमिक निवड समितीने ३८ खेळाडूनची निवड केली.
प्राथमिक संघ खालील प्रमाणे
प्रणव कपिल जाधव , मंदार सतीश उगले , हिमांशू चंद्रकांत फेगडे ,वेदांत उमेश रहान , दीपज्योतसिंग आनंद , शंतनु संदीप कुलकर्णी , दिविक अशोक उपाध्याय , जतीन जितेंद्र वर्मा , यश वासुदेव पाटील , कृष्णा पंकज महाजन, हितेश नरेश नायदे , मिलिंद किशोर दांडगे ,आदि शिरीष पाटील , प्रतीक सतीश शिंदे , दर्शन उमेश सोनवणे, निखिल चंद्रकांत पवार, प्रथमेश चौधरी, यश अग्रवाल आर्यन बडगे , सोहम जैन , साई बनाईत , ओजस सुवर्णकर नचिकेत माळी, सिद्धांत हरणे, चेतन सोनवणे, क्रिशी नथानी, पवन सुधीर पाटील, क्रिश दीपक धांडोरे , कैवल्य देशपांडे, सक्षम नितीन सोनवणे, साहेबसिंग बावरी, मुशरफ खान सईद खान, जतिन जितेंद्र पाटील, राज राजपूत, आदित्य वाणी ,प्रथमेश श्रीनिवास पाटील, निनाद ज्ञानेश्वर पाटील ,साद सय्यद वरील संघ संजय पवार, संतोष बडगुजर, चंदन वाणी यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले.
निवड झालेल्या खेळाडूंनी मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.