DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पोटच्या मुलाचा आईनं केला खून; स्वत:लाही संपवलं

नाशिक:

शहरातील पाथर्डी फाटा परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिलेने गळफासही घेतला आहे. शिखा सागर पाठक (रा. साई सिद्धी अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर रिधान सागर पाठक असे मृत मुलाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय हिने सोमवार (दि. 9) रात्री राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर ,पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. साडेतीन वर्षांचा रिधान ऑनलाईन अभ्यास करत नव्हता. त्या कारणातून शिखा पाठक हिने रिधानचा खून करून स्वतः आत्महत्या केली, असा जबाब सागर पाठक व त्याच्या आईवडिलांनी पोलिसांना दिला आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.