प्रेमाच्या महिन्यात प्रेमाची सुरुवात करताय तर प्रेमाचा काजवा हे सुपरहिट गाणं नक्की पहा….
नाशिक : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा, गुलाबी महिना. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन गाणे दाखल झाले आहे. या गाण्याचे बोल काजवा असे आहेत. हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
गीतकार विजय भाटे,गायक हर्षवर्धन वावरे आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात हे गाणे सजले आहे. मराठी म्युझिक टाऊन आणि सीएसइ प्रोडक्शन प्रस्तुती असलेल्या या गाण्यांचे दिग्दर्शन नाशिकच्या रोहित जाधव यांनी केले आहे. त्याला पटकथा मध्ये स्वप्निल पाटील ने सहकार्य केल. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या भाषेला साजेसा असा एक माहौल निर्माण केला गेला आहे. या गाण्यात एक तरूण आपल्याला आवडणाऱ्या मुलीला प्रपोझ करण्यासाठी त्याची सुरू असलेली घालमेल पाहायला मिळते आहे. शेवटी तो तिला मनवतो असे या गाण्यात दाखवले आहे.
ट्रेडीशनल गाण्याला रोमँटिक टच देऊन एक नवे व्हर्जन सादर करण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे. या गाण्याचे बोल राहूल काळे यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शनही विजय भाटे यांनी केले आहे. काजवा मधून निक शिंदे आणि सृष्टी आंबवले हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वेगळ्या बाजातील काजवा हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. या गाण्याला १ million प्रेक्षकांच्या पसंती मिळाली आहे. याशिवाय गाण्यासाठी रोहित ची टीम ने विशेष मेहनत घेतली आहे.