DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बापरे…..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले !

पहूर ता. जामनेर तालुक्यातील एकाच गावातून एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आली आहे. पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील गावात राहणारे कुटुंबियांसह १६ वर्षाची आणि दोन १५ वर्षाच्या अशा तीन मुलींसह राहतात. ९ सप्टेंबररोजी सकाळी घराच्या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आली. पालकांनी चहा पाजून सह नातेवाईकांकडे धावपळ करत शोधाशोध केली परंतू मुली कुठेच आढळून न आल्याने. रात्री पालकांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.