DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मारवड भागातील मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला कंटाळले ग्रामस्थांनी केली बदलीची मागणी.


अमळनेर🙁प्रतिनिधी नूर खान) मारवड भागाचे मंडळ अधिकारी दिलीप पुंजू पाटील हे मारवड येथील सजा कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांच्या नोंदी वेळेवर होत नाहीत, कुठल्याही शासकीय अर्जाचा निपटारा वेळेत होत नाही. तसेच ग्रामस्थांनी फोन केला असता फोन न उचलणे किंवा चुकीची माहिती देत दिशाभूल करणे अशी कामे ते करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ/ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून सदर मंडळ अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ बदली करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.