DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

युक्रेन-रशियाच्या युद्धात अडकलेला थोरगव्हाणचा गजानन चौधरी परतला मायदेशी

चोपडा | प्रतिनिधी

 

थोरगव्हाण (ता.यावल) येथील रहिवासी तथा मितावली (ता.चोपडा) हल्ली मुक्काम इंदोर येथील सुकदेव मुलचंद पाटील यांचा भाचा गजानन मधुकर चौधरी  हा युक्रेन  मध्ये एमबीबी एसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून,रशिया व युक्रेनच्या  सुरू असलेल्या युद्धामुळे तो युक्रेन मध्ये अडकला होता. युद्धजन्य परिस्थितीतून केंद्र सरकारच्या गंगा ऑपरेशन मोहिमेत गजानन चौधरी हा बुधवारी रात्री इंदोरला विमानतळावर मायदेशी परतला.  त्यानंतर तो इंदोर येथील मामा सुखदेव पाटील यांच्या सोबत गुरुवारी दुपारी १२ वाजता चोपडा शहरात पोहचला.

यावेळी जेष्ठनेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी गजानन चौधरी याचा सत्कार  करण्यात आल्या. यावेळी शहरातील लक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अश्विनी प्रसन्न गुजराथी व संचालिका तसेच महिला मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ.पूनम आशिष गुजराथी , माजी आमदार कैलास पाटील,जिल्हा बँकेचे संचालक घनशाम अग्रवाल,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,चोसाकाचे व्हॉ.चेअरमन शशिकांत देवरे, नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी,पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ पाटील,युवा उद्योजक आशिष गुजराथी,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,सुतगिरणीचे संचालक प्रकाश रजाळे,तुकाराम पाटील,आदिवासी कार्यकर्ते नादान पावरा,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समाधान माळी यांचेसह आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.