राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मुंबई :वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही