DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी मेगा भरती

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार, भूमी अभिलेखाच्या पदांवर 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत.

यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट https://landrecordsrecruitment2021.in/ भेट देऊन अर्ज ऑनलाइन करायचा आहे. नोटीसनुसार, या पदाची भरती पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

 

सूचनेनुसार, भूमी अभिलेख पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराकडे सिव्हील इंजिनीअरिंग डिप्लोमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 • उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातुन शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी 30 WPM किंवा 40 WPM पर्यंत टायपिंग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि कम्प्युटर टायपिंग येणं अनिवार्य आहे.
 • उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

डॉक्क्युमेंट्स :

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगचे सर्टिफिकेट
 • शाळा सोडल्याचा दाखला (School leaving certificate)
 • मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला (Caste certificate)
 • ओळखपत्र (Aadhaar Card, License)
 • 2 पासपोर्ट साईझ फोटो

 

 

 

भूमी अभिलेख भर्तीमध्ये रिक्त जागा :-

 

 • कोकण विभाग- 244
 • औरंगाबाद विभाग – 207
 • नागपूर विभाग – 189
 • पुणे विभाग- 163
 • अमरावती विभाग- 108
 • नाशिक विभाग- 102

 

 

महाराष्ट्र भरती भूमी अभिलेखात किती पगार मिळेल ?

भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्रातील भरतीमध्ये निवड झाल्यानंतर, उमेदवारांना रु.19900 ते रु.63200 प्रति महिना वेतन मिळेल.

 

परीक्षा शुल्क :- 

 • खुला (Open) वर्ग: ₹ 300 /- रुपये
 • राखीव (Reserved) वर्ग: ₹ 150/- रुपये

अधिकृत वेबसाईट :- https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

परीक्षा : 23 जानेवारी 2022

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.