DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विश्वकर्मा समाज मंदिराची मोडतोड झाल्याने आज जामनेर मधे महाराष्ट्र राज्य सुतार जनजागृती सेवा मार्फत जामनेर तहसिलदार यांना निवेदन.

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे

मु.पो.कबनूर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले येथे समाज मंदिराची गंभीरपणे मोडतोड झाल्याने व दहशत निर्माण करणार्या समाज कठंक लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावे. अन्यथा सुतार जनजागृती सेवा संस्थे च्या वतीने संपूर्ण तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदना मार्फत आज रोजी जामनेर येथे नायब तहसीलदार कूभांर साहेब यांना देण्यात आले . निवेदन देते वेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव, तालुका युवा अध्यक्ष संजीव सूर्यवंशी ,तालुका सचिव ईश्वर जंजाळकर, तालुका सहसचिव नंदकिशोर आहिरे, शहराध्यक्ष किरण सोनवणे , शहर सचिव प्रसन्ना चांदेकर ,गोपाल शार्दुल, योगेश चांदेकर ,संतोष सुर्यवंशी,राहुल नेरकर, मनोज हिरे ,वैभव सोनवणे, गौरव सोनवणे,आदी सुतार जनजागृती सेवा संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.