३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक
यावल | प्रतिनिधी
तालुक्यातील दहिगाव येथे भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, दहिगाव येथे एक कुटुंबिय भाडेकराच्या घरात राहतात. भाडेकरू यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान, मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय२५) याने काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान, त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.
दरम्यान, या प्रकारामुळे संबंधीत कुटुंबाला भयंकर धक्का बसला असून त्यांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार कैलास प्रल्हाद पाटील (वय२५, रा. दहीगाव, ता. यावल) याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.