स्वातंत्र्यवीर सावरकरांना महापालिकेतर्फे अभिवादन

जळगाव – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव शहरात महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांनी सकाळी स्वातंत्र्यवीर चौकात असलेल्या पुतळ्याजवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळेला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, नगरसेविका आशा पाटील, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर महानगरपालिकेच्या आवारात देखील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment