जळगाव पोलीस दलात पदभार हस्तांतरण; डॉ. रेड्डी यांना निरोप, श्रीकांत ढीवरे यांचे स्वागत

जळगाव –  जिल्हा पोलीस दलात आज पदभार हस्तांतरणाचा सोहळा उत्साहात पार पडला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांच्याकडे अधिकृतरित्या जबाबदारी सुपूर्द केली. या कार्यक्रमाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. रेड्डी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर बसवलेला नियंत्रण आणि राबवलेले विविध जनहिताचे उपक्रम यांचा गौरव करण्यात आला. सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, नव्या पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत ढीवरे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याच्या सुरक्षाव्यवस्थेला मोठा फायदा होईल, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पदभार स्वीकारल्यानंतर श्रीकांत ढीवरे यांनी विविध विभागांना भेट देत कामकाजाची माहिती घेतली.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
Comments (0)
Add Comment