आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने व रोकड लंपास

जळगाव – शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौक परिसरात धावत्या बसमधून चोरीची घटना उघडकीस आली आहे. बसच्या डिक्कीत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या २७ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता प्रवास करत असताना त्यांची बस आकाशवाणी चौकातून जात होती. यावेळी बसच्या डिक्कीत ठेवलेले त्यांचे साहित्य चोरट्याने चोरून नेले.
या चोरीत सुमारे १२ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली आहे. घटनेनंतर राठोड यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
Comments (0)
Add Comment