लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भाजपतर्फे अभिवादन

जळगाव  : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा ओबीसी समाजाचे प्रभावी नेतृत्व करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सायंकाळी ४.३० वाजता आयोजित कार्यक्रमात स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी आणि गटनेते प्रकाश बालानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी उदयजी भालेराव यांनी स्व. मुंडे यांच्या कार्याचा आणि राजकीय प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देत कार्यकर्त्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, जयेश भावसार, दीपक परदेशी, मिलिंद चौधरी, राजेंद्र मराठे, प्रकाश पंडित, नगरसेवक अरविंद देशमुख, राजेंद्र घुगे पाटील, रमेश मतानी, राहुल पाटील, बापू ठाकरे, गणेश माळी, जितेंद्र चव्हाण, भगवानभाऊ, क्षितिज भालेराव, मुविको कोल्हे, मनोज बाविस्कर, लाडवजारी काका यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment