जळगाव : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तसेच जळगाव जिल्ह्यात भाजपची भक्कम पायाभरणी करणारे ज्येष्ठ नेते स्व. चंद्रकांत (मेंढकी) काका यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारताच्या संकल्पनेसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तसेच जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक उभारणी करताना स्व. चंद्रकांत मेंढकी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, गटनेते प्रकाश बालाणी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी व नितीन इंगळे, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते व उपाध्यक्ष उदय भालेराव, रेखा वर्मा, दीपक परदेशी, अशोक राठी, भूषण लाडवंजारी, ललित बडगुजर, सागर पाटील, दीप्ती चिरमाडे, नगरसेवक निलेश तायडे (निलू आबा), जितेंद्र चव्हाण, सैनिक आघाडी संयोजक राजेंद्र मराठे, राजश्री सोनवणे, शिरीष तायडे, दिलीप लाडवंजारी, युवा मोर्चा सरचिटणीस रोहित सोनवणे, हर्षल सिखवाल, अमित देशपांडे, अशोक कोष्टी, दीपक कोळी, तुषार सूर्यवंशी, डॉ. नितीन पाटील, सरोज पाठक, प्रशांत सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.