मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात विशेष मोहीम

जळगाव : मा.भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी १९ व २० तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा स्थलांतरित/गैरहजर असल्यामुळे नोंद सुटलेल्या नागरिकांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमून दिलेल्या केंद्रांवर वरील दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत उपस्थित राहतील.या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे व तपशिलांची दुरुस्ती तसेच नाव वगळण्याचे अर्ज भरून घेण्याची कामे केंद्रांवर  केली जाणार आहे.नवयुवकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी व त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरही विशेष प्रयत्न केले जात आहेत. या विशेष शिबिरांमध्ये महिला आणि दिव्यांगांच्या मतदार नोंदणीस विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्हयातील सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही अशा सर्व संबंधितांनी नजीकच्या मतदान केंदावर भेट देऊन या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत किंवा आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment