जळगावात ‘किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी’चे भव्य उद्घाटन

ग्राहकांसाठी डायमंडच्या घडणावळ शुल्कावर ३५ टक्के, तर सोन्याच्या दागिन्यांवर २० टक्के सूट

जळगाव : शहरातील जेडीसीसी बँकेसमोर, दीनानाथ वाडी, रिंग रोड येथे ‘किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी’च्या ११व्या विशेष शोरूमचे दिमाखात उद्घाटन २० सप्टेंबर रोजी झाले. राज्यसभा खासदार व विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मनपाच्या महापौर दीपमाला काळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे, अनिल जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानिमित्त आकर्षक ऑफर्स
जळगावकर ग्राहकांसाठी शोरूमच्या उद्घाटनानिमित्त विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. डायमंड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर थेट ३५ टक्के, तर गोल्ड ज्वेलरीच्या घडणावळ शुल्कावर २० टक्के सूट दिली जात आहे. तसेच जुने सोने देऊन डायमंड ज्वेलरीची खरेदी केल्यास १०५ टक्के मूल्य मिळवण्याची संधी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

‘हर घर किसना’चे ध्येय
हरी कृष्ण ग्रुपचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक घनश्याम ढोलकिया म्हणाले, सण-उत्सवांच्या काळात दागिने हा आनंदाचा अविभाज्य भाग असतो. जळगावमधील या शोरूमच्या माध्यमातून डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीचे विविध पर्याय स्थानिक ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. ‘हर घर किसना’ हे ध्येय अधिक बळकट करत प्रत्येक भारतीय कुटुंबापर्यंत डायमंड ज्वेलरी पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे सीईओ पराग शहा यांनी महाराष्ट्रातील कंपनीची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी जळगाव हे महत्त्वाचे शहर असल्याचे सांगितले. स्थानिक ग्राहकांच्या पसंतीला आणि सणासुदीच्या परंपरांना अनुरूप विविध डिझाइन्स, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट शोरूम अनुभव देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

किसनाचे एक्सक्लुझिव्ह बँड आउटलेट भागीदार योगेश अशोक चौधरी, वैभव प्रवीण चौधरी आणि अंकुश राजेंद्र चौधरी यांनीही जळगावच्या दागिन्यांच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख केला. पारंपरिकता आणि आधुनिक शैलीचा संगम असलेल्या डिझाइन्सना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीच्या विस्तृत कलेक्शनसह सुरू झालेले हे शोरूम जळगावकरांसाठी दागिन्यांच्या खरेदीचा नवा अनुभव देणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment