डॉ.शिवचरण उज्जैनकर सर यांचा सत्कार

अमळनेर:- (नूर खान) शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट व मानद डीलीट मिळाल्याबद्दल नुकतेच शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री गणेश कोळी सर यांचे वडील श्री यशवंत कोळी तथा आई सौ विमलताई कोळी यांनी उज्जैनकर सर यांच्या निवासस्थानी येऊन उज्जैनकर सर यांचा सपत्नीक सौ. संगीता उज्जैनकर यांच्यासह गुलाब पुष्प बुके देऊन सत्कार केला.
त्याचप्रमाणे नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी येथे डॉ शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट व मानद डिलीट मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री शरद चौधरी सर श्री दत्तात्रय फेगडे सर श्री शरद बोदडे सर श्रीमती वैशाली सोनवणे मॅडम. श्री. मंगेश दांडगे, श्री.संदीप पावरा, श्री विशाल काकडे, श्री नवल कोळी श्री अनिल चौधरी आदींनी उज्जैनकर यांचा गुलाब बुके देऊन विद्यालयामध्ये सत्कार केला.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment