नेहरू युवा केंद्र अमळनेर तर्फे पराक्रम दिवस साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) भारत सरकारचा युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय पराक्रम दिवस साजरा करण्यात आला.
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा
या वाक्याचा सकारात्मक प्रेरणादायी विचार घेऊन युवकांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम, आणि युवकांना सैन्या विषयीची अस्मिता ,उत्साह जोश निर्माण करण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांचे चरित्र .त्यांचे विचार आणि त्यांची सैनिकाविषयीची त्यांची कर्तुत्वावर कहाणी युवकांना व्हावी आणि युवकांनी देखील देश सेवेसाठी समर्पणाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये कॅच द रेन म्हणजेच पाण्याची बचत, पाण्याचे वापर ,आणि पाण्याची संगोपन कसे करावे. जेणेकरून वाहून जाणारे पाणी अडवले जाईल , अडवलेले पाणी जिरवाता येईल. जिरवलेले पाणी परत पुन्हा वापरता येईल.या संदर्भात ची माहिती वैशाली बाविस्कर जमलेला लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला.लहान मुलांना पाणी कसे वाचवावे.त्याचे संगोपन कसे करावे.त्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल . या संदर्भाची विषय घेऊन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.त्याचे बक्षीस वितरण देखील आज करण्यात आले लहान मुलांचा कृती शक्तीला विचारशक्तीला चालना देण्यासाठी आणि भविष्यात पाणी वाचवण्याची जागृतता निर्माण व्हावी या उद्देशाने ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . या चित्रकला स्पर्धेत एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक विद्यार्थ्याने छानसे चित्र काढून
“पाऊसचे पाणी आडवा पाणी जिरवा”
लहान मुलांनी ही संकल्पना चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment