जामनेर येथे युवा सेनेची आढावा बैठक संपन्न…..

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे दि.२९ वार शनिवार रोजी जामनेर तालुका युवा सेनेची आढावा बैठक पार पाडण्यात आली. या बैठकीवेळी मा. चैतन्यजी बनसोडे युवासेना जळगाव विस्तारक सहसचिव व चंदू भाऊ शर्मा जिल्हा युवा सेना प्रमुख* यांच्या उपस्थितीत जामनेर येथे संपन्न झाली. तालुक्यातील संघटनात्मक काम व नवीन कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या त्यासोबतच युवा सेना जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचेल त्याबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आलं. घर तिथे युवा सैनिक व गाव तिथे युवा सेनेची शाखा कशी पोहोचेल अशाप्रकारचे आश्वासन शिवसेना-युवासैनिक राहुल भाऊ चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना समन्वयक कृष्णा गुरव यांनी केले तर सूत्रसंचालन दिपक माळी सर यांनी केले. त्यासोबतच शिवसेना नेते ज्ञानेश्वर बोरसे, विश्वजीत पाटील-युवा सेना जिल्हा उप-अधिकारी ,अतुल सोनवणे - शहर प्रमुख,ज्ञानेश्वर जंजाळ ,सुरेश चव्हाण, मा.शहर प्रमुख पवन माळी, नरेंद्र धुमाळ, विशाल भोई मनोज मिस्तरी, सुपडू माळी, बबलू सुरवाडे,अनिल सूर्यवंशी, सईद भाई, इम्रान भाई अजून, सुनील ठाकूर, गोपाल माळी,फैजल भाई, ईश्वर नाईक,सागर साठे, पंकज राठोड अमोल कोळी संजय पाटील,भानुदास कोळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हजर होते.
बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment