गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग

जळगाव । प्रतिनिधी

शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.

गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे घराजवळ कार पार्क केली होती. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात माथेफिरूने चारचाकीला आग लावत तिथून पळ काढला. चारचाकीला आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत ती पूर्ण आगीच्या सपाट्यात सापडली होती. आगीत चारचाकी पूर्ण जळाली असून केवळ सांगाडा शिल्लक आहे.

बातमी शेअर करा !
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment