घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई

 

 

जळगाव : प्रतिनिधी 

पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फातेमानगरातील एक व्यक्ती सुप्रिम कॉलनी भागातील पोलिस कॉलनीजवळील रिक्षा स्टॉपनजीक एका टपरीच्या आडोशाला घरगुती गॅसचा काळा बाजार करून तो बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये गॅस इंधन म्हणून भरून देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी दुकानावर छापा टाकून पोलिसांनी १४ हजार २०० रुपयांचे गॅस सिलिंडर आणि वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे २१ हजार १०० रुपये किमतीचे मशीन असा एकूण ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर सदर व्यक्तीवर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रीतम पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

 

बातमी शेअर करा !
black marketcity police stationDomestic gas cylinderillegal businessvehicles
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment