खेडगाव नंदीचे येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा ;- तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेत शिवारात एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक प्राप्त माहिती अशी की, मंथन राजेंद्र पाटील (वय – २३) रा. खेडगाव (नंदीचे) ता. पाचोरा हा तरुण शेतकरी ६ आॅगस्ट रोजी सकाळी शेतात कामानिमित्त गेला होता. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना मंथन यास एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच मंथन यास रुग्णवाहिका चालक निळु पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मंथन यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मंथन पाटील याचे पाश्चात्य आई, वडिल, एक बहिण असा परिवार असुन अतिशय होतकरू व मनमिळाऊ स्वभावाचा मंथन पाटील याचे अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा !
Pachorasnake biteyong farmer
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment