चोपड्यात घरफोडीतून ७० हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की संजय बिलाजी पाटील वय 45 हे नोकरी करत असून शहरातील ग्रामसेवक कॉलनी मध्ये आपल्या परिवारासह राहतात. कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने कडे कोंडा तोडून घरातील 57 हजार रुपये रोकड पाच हजार रुपये किमतीचा टीव्ही सेट टॉप बॉक्स, चांदीची गणपती व लक्ष्मीची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार चार ऑगस्ट 2023 रात्री 8 ते 5 ऑगस्ट 2023 सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहे को दीपक विसावे करीत आहे.

बातमी शेअर करा !
#chopdachoriCrimegharfodi
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment