विद्यार्थ्याचा जळगावमधून मोबाईल लांबविला

जळगाव;– येथील नवीन बस स्थानक मधून एका विद्यार्थ्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार ८ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गोकुळ सुभाष घाटे व 29 रा. गिरजा कॉलनी, जामनेर हा विद्यार्थी ८ रोजी जळगाव येथील नवीन बस स्थानक परिसरात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आला असता अज्ञात चोरट्याने त्याचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला याप्रकरणी गोकुळ याने तात्काळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कमलेश पवार करीत आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaonchoriCrimemobail
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment