खर्दे येथील शिक्षकाचा मतदान केंद्रातच हृदयविकाराने मृत्यू

जळगाव ः धरणगाव तालुक्यातील खदें बु येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रविंद्र बारसे यांचे नियुक्तीच्या शाळेत मतदान सुसुत्रीकरण विषय कामकाज करत असतांनाच आज हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना खर्दे येथील मतदान केंद्र क्रमांक १०४ वर घडली. रविंद्र रतिलाल बोरसे हे जि.प शाळा खर्दे बु येथे शिक्षक मुळ रा. धुपे खुर्द ता. चोपडा येथील रहिवासी आहे. रविंद्र बोरेसे हे त्यांच्या नियुक्तीच्या शाळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पदाचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण विषयक कामकाज करीत असतांना त्यांना हृदयविकाराचा तत्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालविल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
#4 Arrested #Jalgaon Crime #Jalgaon Milk Sangh #Milk Powder #Misappropriationdharngav
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment