अमळनेर मधून चोरट्याने लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;- शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा आठ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गोकुळधाम सोसायटी प्रताप मिल कंपाऊंड येथे राहणारे परशुराम संग्राम पवार हे कॉम्प्युटर दुरुस्ती विक्रीचा व्यवसाय करीत असून तीन रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराची कडी अज्ञात व्यक्तीने खोलून आत प्रवेश करून आठ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत परशुराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घनश्याम पवार करीत आहे.

बातमी शेअर करा !
AmalnerCrime
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment