भुसावळात मोटारसायकल लांबविली

भुसावळ : शहरातील प्रीमियर हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र प्रभाकर धनपाल (वय ४७) रा. विकास कॉलनी, प्रीमियर हॉटेलच्या मागे, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी (एमएच १९ एआर ६२०६ ) आहे. ही दुचाकी प्रीमियर हॉटेल समोर पार्किंगला लावलेली होती. दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोरून नेली, हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजेंद्र धनपाल दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, तरी देखील दुचाकी मिळाली नाही, अखेर त्यांनी शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी करीत आहे.

बातमी शेअर करा !
A motorcycle was parked in Bhusawal
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment