धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधक पालरेचा यांनी दिल्यानंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस सचिन भावसार यांनी धाव घेतली.

त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. तरुणाच्या अंगात काळा पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. तसेच उजव्या हातावर हनुमान तर डाव्या हातावर भारती असे नाव गोंदलेले आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीस सचिन भावसार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
#chopda#dharangaon#jalgaon#JamnerAbduction of Minor GirlAmalnerbhadgaonbhusawalBike TheftBodwadBurglaryChalisgaonCrimeDead Body FoundDHULEerandolFaizpurFightForcible TheftfraudHangingjalgaon policeKnife AttackmuktainagarNANDURBARPachoraPahoorparolaRailway CuttingraperaverRiotRobberySawdashendurniSuicideTerrorTheftTortureYaval
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment