जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

जळगाव;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून “एमसी टॅलेंट हंट” या कंपनीच्या संचालिका मोनिका चौधरी, रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. यावेळी २११ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर १६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.

यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणे, विध्यार्थ्यानी व्यवसाय करावा, यासाठी केंद्र कार्य करते. सुरवातीला कंपनीच्या संचालिका मोनिका चौधरी यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगत विविध टप्यात उपस्थित विध्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेतल्या.

प्लेसमेंट आसोसीएट डीन प्रा. मनीष महाले यांनी प्रास्ताविक केले. तर लिजी वर्गीज या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले तसेच प्रा. करिष्मा चौधरी व प्रा. तुषार वाघ यांनी सहकार्य केले. हि सर्व प्रक्रिया ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले़.

बातमी शेअर करा !
#jalgaonG H Raisoni Institute of Business Management
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment