बाळद येथील इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

बाळद, ता. पाचोरा ;- तालुक्यातील बाळद खुर्द येथील महादू नारायण पाटील (वय ५८) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महादू पाटील हे २४ रोजी शेतामध्ये बैलांसाठी गवत कापण्याचे काम करीत असताना हि दुर्दैवी घटना घडली .

त्यांना विषारी सापाने दंश केला. यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. महादू पाटील यांची परिस्थिती हलाखीची असून ते कर्जबाजारी शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मजुरी करून ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. सतत हसतमुख असणाऱ्या महादू पाटील यांचा अचानक दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा !
Pachorasnake bite
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment