ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला .

नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जळगाव शहर व ग्रामीण कॉग्रेसची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महानगराध्यक्ष शाम तायडे, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठेयांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ड्रग्जमुळे महाराष्ट्रातील युवापिढी बरबाद होत असून गुजरातमधूनच हे ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे. पण आम्ही महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ देणार नाही. भविष्यात ललीत पाटीलचे काहीही होऊ शकते अशी भीतीपटोले यांनी व्यक्त केली.यावेळी नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र शासन यांच्यावर कडाडून टीका केली.

बातमी शेअर करा !
#jalgaoncongressnana ptole
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • राज्य
Comments (0)
Add Comment