राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर

जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीसपदी वाय.एस.महाजन सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते वाय.एस.महाजन सर यांना नियुक्तीपत्र अमळनेर येथे ना.अनिल पाटील यांच्या कार्यालयात देण्यात आले.
पक्ष संघटनेच्या दृष्टीने सदर नियुक्तीचे योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण असून महाजन हे त्या पदाला साजेशी कामगिरी करतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिला. याप्रसंगी अशोक पाटील,योगेश देसले,संजय वाघ,ललीत बागुल,अभिलाषा रोकडे,किशोर पाटील,जगदीश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीबद्दल वाय.एस.महाजन सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment