राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, नागरिकांना सर्तकतेचा इशारा

महाराष्ट्र:

महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. उत्तर कोकणात ठाणे , पालघर आणि मुंबई मध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवला.

आयएमडीच्या वतीनेही येत्या 24 तासात महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिली आहे.

बातमी शेअर करा !
MaharashtraRain Updates
  • ताज्या बातम्या
  • राज्य
Comments (0)
Add Comment