पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

जळगावः शहरातील मोहाडीरोवरील खुबचंद साहित्या टॉवर परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरी लावण्यासाठी पाच लाखांची मागणी करत सासरी भुसावळातील गांधीनगर येथे शिवीगाळ करत मारहाण करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा नितीन मेढे (वय २३) यांचा विवाह भुसावळ शहरातील गांधी नगरातील नितीन विजय मेढे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेले आहे. लग्नाच्या चार महिन्यानंतर नोकरी लावण्यासाठी विवाहितेला माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही. याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment