नवी दिल्ली – २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या अमानवी कृत्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई आणि लष्करी कारवाई केली. या कारवाईत ठार झालेल्या पाच कुख्यात दहशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची माहिती:
-
मुदस्सर खादियान खास (उर्फ मुदस्सर / अबू जुंदाल)
-
लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ नेता
-
मुरीदके येथून कारवायांचे संचालन
-
पाक लष्कराकडून लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार
-
-
हाफिज मुहम्मद जमील
-
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित
-
मौलाना मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक
-
आर्थिक व्यवहार व तरुण कट्टरतावाद पसरवण्यात भूमिका
-
-
मोहम्मद युसूफ अझहर (उर्फ उस्ताद जी / मोहम्मद सलीम / घोसी साहब)
-
जैश-ए-मोहम्मदचा शस्त्र प्रशिक्षण प्रमुख
-
मसूद अझहरचा मेहुणा
-
आयसी-८१४ अपहरण प्रकरणात संशयित
-
-
खालिद (उर्फ अबू आकाशा)
-
लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय दहशतवादी
-
अफगाण शस्त्र तस्करीत सामील
-
फैसलाबादमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
-
-
मोहम्मद हसन खान
-
जैश-ए-मोहम्मदचा सदस्य
-
पीओके कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा मुलगा
-
दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन व अंमलबजावणी
-