मुंबई | प्रतिनिधी
अरबी समुद्रातील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात सोमवारपासून (१९ मे) पावसाची सरी सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण व घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२२ मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे १९ ते २५ मे दरम्यान काही भागांत मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग ५५ ते ६० किमी/ताशीपर्यंत जाऊ शकतो. सखल भागांत पाणी साचणे, झाडे किंवा झाडाच्या फांद्या पडणे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे अशा घटनांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार:
-
ऑरेंज अलर्ट:
-
सोमवार: नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसर
-
मंगळवार: पुणे घाट परिसर
-
मंगळवार ते गुरुवार: सिंधुदुर्ग
-
बुधवार, गुरुवार: रत्नागिरी
-
गुरुवार: रायगड, कोल्हापूर घाट परिसर
-
-
यलो अलर्ट:
-
उत्तर कोकणात गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा
-
सूचना नागरिकांसाठी
-
उंच झाडांखाली किंवा कमकुवत बांधकामाजवळ थांबू नये
-
मोकळ्या जागेत व मेघगर्जना होत असताना थांबणे टाळावे
-
मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला
हवामान विभागाने या प्रणालीच्या हालचाली आणि तीव्रतेनुसार अंदाज अद्ययावत करण्याचे सांगितले आहे.