अमळनेर : शहरातील सराफ गल्लीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना गुरुवारी (२२ मे) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेहान सादिक बागवान (वय १९) हे आपल्या कुटुंबासह सराफ बाजार भागात राहतात. २१ ते २२ मे दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि रोकड चोरून नेली. चोरीची माहिती गुरुवारी सायंकाळी समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.