जळगाव – राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. आता पुन्हा २८ जूनपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २८ जून ते १ जुलै दरम्यान जळगावसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग ताशी १५ ते २० किमी दरम्यान असू शकतो.
राज्यभरातील हवामानाचा आढावा:
-
मध्य महाराष्ट्र: पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार.
-
पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक (पश्चिम भाग): यलो अलर्ट जारी.
-
सातारा व कोल्हापूर घाटमाथा: ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
-
कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग): २८ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता.
-
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार): जोरदार पावसाचा अंदाज.
-
विदर्भ व मराठवाडा: वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस; बीड, परभणी, लातूरमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित.
-
मुंबई: शनिवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी यलो अलर्ट कायम.
-
पुणे: हलक्या स्वरुपाचा पावसाचा अंदाज.