“हनी ट्रॅपच्या ‘बॉम्ब’वर बसले राज्य? प्रफुल्ल लोढाकडे सर्व व्हिडीओ – खडसेंचा खळबळजनक खुलासा”

मुंबई/ जळगाव : राज्यात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने नवे वळण घेतले असून माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खसखस उडाली आहे. खडसेंनी म्हटले की, “प्रफुल्ल लोढा या व्यक्तीकडे हनी ट्रॅप प्रकरणाचे सर्व व्हिडीओ आहेत. एकच बटण दाबलं, की देशभरात गोंधळ माजेल.”

खडसे यांनी एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यात ७० हून अधिक वरिष्ठ अधिकारी, मंत्री आणि अन्य व्यक्ती हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचे समोर येत आहे. काही अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचीही माहिती खडसे यांनी दिली.

प्रफुल्ल लोढावर गंभीर आरोप:

प्रफुल्ल लोढा या जळगावातील व्यक्तीवर अंधेरी आणि साकीनाका पोलीस ठाण्यांत दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक प्रकरण अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि छळाचे असून दुसरे प्रकरण हनी ट्रॅप संदर्भातील आहे.

राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी:

लोढा हा पूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत कार्यरत होता. त्यानंतर भाजपात प्रवेश करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईकही उपस्थित होते, असे खडसे यांनी सांगितले.

‘चांगले संबंध कुठे बिघडले?’

लोढा, गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांचे चांगले संबंध होते. मात्र, नंतर लोढानेच त्यांच्या विरोधात तक्रार केली. यामुळे संबंध कसे ताणले गेले? असा सवाल खडसे उपस्थित करतात.

व्हिडीओ आणि दावा:

खडसेंच्या म्हणण्यानुसार, लोढाने तयार केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “मी कुणाला आई म्हणालो, वहिनी म्हणालो. पण एक बटण दाबलं की देशभरात हाहाकार माजेल.”

राऊतांचा आरोप आणि मागणी:

शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनी देखील यावर गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लोढा आणि गिरीश महाजन यांचा एकत्र फोटो ट्वीट करत, “हनी ट्रॅप अस्तित्वातच नाही, असं म्हणणारे मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत,” असा आरोप केला. याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

बातमी शेअर करा !
  • Uncategorized
Comments (0)
Add Comment