बांधकाम व असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा – निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील बांधकाम आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने नुकतेच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना खामगाव येथे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळी, नामदेव पाटील, सोपान कापसे, रितेश कोळी, अमोल सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • बांधकाम कामगारांची नव्याने नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.

  • कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटसाठी आवश्यक असलेली नोंदणी सुरू करावी.

  • कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची प्रकरणे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत, ती लवकरात लवकर निकाली काढावीत.

  • ई-श्रम कार्डधारक असंघटित कामगारांना अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपयांचा विमा लागू आहे, परंतु नैसर्गिक मृत्यू झाल्यासही विमा लाभ मिळावा.

  • ६५ वर्षे पूर्ण केलेल्या असंघटित कामगारांना ‘श्रावणबाळ योजना’त समाविष्ट करण्यात यावे.

या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनात केली आहे.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment