जळगाव | प्रतिनिधी
भाजप मंडळ क्रमांक ३ अंतर्गत संघटनात्मक कार्यशाळेची बैठक आज, मंगळवार ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मंडळ उपाध्यक्ष योगेश वाणी यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
या बैठकीस जळगाव महानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, उपाध्यक्ष नितीन इंगळे, सौ. भारतीताई सोनवणे, जयेश भावसार, प्रकाश बालानी, सौ. दीपमाला काळे, महेश पाटील आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत रक्षाबंधन, हर घर तिरंगा आणि विभाजन विभीषिका दिवस यासारख्या आगामी अभियानांची रूपरेषा व नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय केसवाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन शुचिताताई हाडा यांनी केले.