स्वातंत्र्य दिनी 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

धुळे : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 8 वर्षीय चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

त्वरीत पोलिस कारवाई
शिरपूर तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल चालक) याला ताब्यात घेतलं असून, त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हालचाली नियंत्रणात आणल्या.

फास्टट्रॅक कोर्टाची मागणी
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला असून, पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी पाहणी केली. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाई करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी जोरदार मागणी केली आहे. पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

बातमी शेअर करा !
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • राज्य
Comments (0)
Add Comment