खग्रास चंद्रग्रहणामुळे शेगावातील गजानन महाराज मंदिराच्या दर्शन वेळेत बदल

शेगाव : रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेला होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

या ग्रहणाचे वेध दुपारी १२.५२ वाजता सुरू होणार असून, प्रत्यक्ष ग्रहण रात्री ९.५७ वाजता लागेल व उत्तररात्री १.२६ वाजता सुटेल. मंदिर प्रशासनाने सांगितले की ग्रहणकाळात नियमित पद्धतीत बदल होणार असून, भक्तांनी याची नोंद घ्यावी.

ग्रहणामुळे सायंकाळची सूर्यास्त व शेजारती होणार नाहीत. तसेच दुपारी १२.५२ नंतर दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी हार, फुले, पान, नारळ किंवा प्रसाद घेऊन येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. मात्र मंदिर खुले राहील व भक्तांना जाळीमधून दर्शन घेता येईल.

तसेच, महाप्रसादालय दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहील. त्यानंतर ग्रहणकाळात प्रसाद वितरण थांबवण्यात येईल. मात्र मंदिराबाहेरील इतर प्रसादालये व अल्पोपाहार केंद्रे नेहमीप्रमाणे सुरू राहतील. संतसेवा समितीने भक्तांना सहकार्याचे आवाहन केले आहे

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • राज्य
Comments (0)
Add Comment