अटल जयंती व वीर बाल दिनानिमित्त भाजप व्यापार आघाडीतर्फे ब्लँकेट वाटप

जळगाव | प्रतिनिधी

भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त तसेच वीर बाल दिनाच्या निमित्ताने भाजप व्यापार आघाडीतर्फे गरजूंसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील १०० गरजू व गोरगरीब बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच बाजार समिती सदस्य व उद्योजक अशोक राठी यांच्या हस्ते करण्यात आले. थंडीच्या दिवसांत गरजूंसाठी आधार ठरेल, अशा या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विनय बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी व्यापार आघाडीचे पदाधिकारी सुरेंद्रजी अग्रवाल, भूषण देपुरा, उमेश जैन, मुकेश कुकरेजा, जितेंद्र चव्हाण, राकेश लड्डा, मनीष ओझा, किर्तन शेजपारा यांच्यासह पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले होते.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयेश भावसार, जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, मनोज सोनवणे, महेश चौधरी, नीलू आबा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हेच अटलजींच्या विचारांचे स्मरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा !
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
Comments (0)
Add Comment