जळगाव : निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून, प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. गणपती नगरातील स्वाध्याय भवन परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.
या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान गुलाबराव देवकर यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
या प्रचार दौऱ्यात गुलाबराव देवकर यांच्यासोबत महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रामुख्याने उमेदवार १३ ‘ब’ चे नितीन तायडे आणि १३ ‘क’ चे प्रफुल्ल देवकर आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नामदेव चौधरी, मधुकर पाटील, माजी नगरसेवक अनिल काळे, पिंटू जाधव, सीए अजय जैन, पुरुषोत्तम चौधरी, विशाल देवकर आदी उपस्थित होते.
स्वाध्याय भवन परिसरात रॅली काढत असताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी गुलाबराव देवकर व उमेदवारांचे स्वागत केले. ‘होम टू होम’ चर्चेमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आगामी निवडणुकीत प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र या दौऱ्यामुळे स्पष्ट होत आहे.
प्रभाग १३ मध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा झंझावात; ‘होम टू होम’ भेटी देत मतदारांशी साधला संवाद
उमेदवार नितीन तायडे, प्रफुल्ल देवकर यांनी घेतले आशीर्वाद
- ताज्या बातम्या
- जळगाव जिल्हा