जळगाव : अपक्ष उमेदवार अनिल पगारिया यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. नितीन भाऊ लड्डा यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केले.
या प्रसंगी भाजप उमेदवार नितीन भाऊ लड्डा यांच्यासह शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, भाजप जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, पितांबर भावसार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल पगारिया यांच्या या निर्णयामुळे महायुतीच्या प्रचाराला बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अपक्ष अनिल पगारिया यांचा भाजप उमेदवार नितीन लड्डा यांना बिनशर्त पाठिंबा
आमदार सुरेश भोळे यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द
- जळगाव जिल्हा
- ताज्या बातम्या