जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ (ड) मधून आम आदमी पार्टीकडून उमेदवारी करणारे योगेश दत्तात्रय हिवरकर हे नाव सध्या चर्चेत आहे. राजकारणात प्रस्थापित चेहऱ्यांपेक्षा एक सामान्य कार्यकर्ता, सेवाभावी वृत्ती आणि सातत्यपूर्ण संघर्षातून पुढे आलेला हा उमेदवार मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
अतिशय सामान्य व गरीब परिस्थितीतून बालपण गेलेल्या योगेश हिवरकर यांनी लहानपणापासूनच समाजसेवा आणि देशभक्तीचे संस्कार जपले. जळगाव शहरातील रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य, स्वच्छता, महिला सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांची त्यांना प्रत्यक्ष जाण आहे. भ्रष्ट आणि दळभद्री राजकारणाविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
गेल्या पंधरा वर्षांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी जळगाव शहरातील अनेक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाशी पत्रव्यवहार, अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत जबाबदार धरणे, वेळप्रसंगी आंदोलने, फेसबुक लाईव्हद्वारे जनजागृती अशा विविध मार्गांनी त्यांनी नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था, पांडे डेअरी चौक व परिसरातील रस्ते, गोलानी मार्केटमागील घाणीची समस्या, नवीन बीजे मार्केटमधील सांडपाण्याचा प्रश्न, देवेंद्र नगर व संभाजीनगर परिसरातील गटारींची समस्या अशा अनेक विषयांवर त्यांनी ठोस हस्तक्षेप करून प्रत्यक्ष काम घडवून आणले. कोरोना काळात गरजू कुटुंबांना अन्नपुरवठा, हजारो परप्रांतीय मजुरांना मायदेशी पाठविण्यासाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे ठळक उदाहरण आहे.
“कार्य हीच ओळख” हे त्यांचे ब्रीदवाक्य असून, त्यांनी कोणतीही सत्ता नसतानाही अनेक प्रश्न सोडवून दाखवले. त्यामुळेच सर्वाधिक समस्याग्रस्त प्रभागातूनच निवडणूक लढवून तो प्रभाग आदर्श विकास पॅटर्न म्हणून उभा करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
आपल्या जाहीर संकल्पनामध्ये त्यांनी नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा, रस्ते व फुटपाथ दुरुस्ती, प्रभावी कचरा व्यवस्थापन, पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था, महिला व बालसुरक्षा, उद्याने व खेळमैदाने, तसेच नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे सुलभतेने मिळावीत यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
आजच्या राजकारणात प्रलोभन, अमिष आणि पैशांच्या जोरावर मते मागितली जात असताना, “मतदान हे सौदा नसून भविष्यासाठीची जबाबदारी आहे” असा ठाम विचार योगेश हिवरकर मांडतात. ते स्वतःला नेता नव्हे, तर जनतेचा सेवक मानतात.
जळगाव शहराचे होत चाललेले पतन थांबवून स्वच्छ, सुरक्षित आणि विकासाभिमुख शहर घडवण्यासाठी एक प्रामाणिक संधी देण्याचे आवाहन ते मतदारांना करीत आहेत. झाडू या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून स्वच्छ राजकारणाला बळ द्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. या निवडणुकीत मतदारांनी क्षणिक लाभापेक्षा दीर्घकालीन विकासाचा विचार करावा आणि परिवर्तनासाठी सज्ज असलेल्या सामान्य माणसाला संधी द्यावी.
“काम बोलते, आश्वासने नाहीत : जळगाव परिवर्तनाच्या दिशेने एक ठाम पाऊल”
- जळगाव जिल्हा
- ताज्या बातम्या